कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरेगाव भीमा येथील हिंसाचारामागे ज्यांच्याकडून सत्ता गेली, ते यात असावेत. काही नेते माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करुन राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणी सीबीआयनेदेखील कोण दोषी आहे याचा अवश्य शोध घ्यावा. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. मी जरी दोषी असलो तरी देहांताची शिक्षा द्यावी. हे पाप कुणाच्या पोटी जन्मले याचा शोध घ्यावा.'' ऍट्रॉसिटीचा संबंध देशात चुकीच्या पद्धतीने वापर चालू आहे. लोकशाहीत एका गटाला ऍट्रॉसिटीचा वापर करण्याचे अधिकार देवून लोकशाहीचा व घटनेचा अवमान केला आहे. याची खोलवर चौकशी झाली पाहिजे. असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी आज केले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews